Thu. Oct 21st, 2021

तूर खरेदी बंद असल्याने शेतकरी रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

सरकारच्या घोषणेनंतरही नाफेडकडून तूर खरेदी सुरू न झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा विस्फोट झाला आहे.

 

बुलडाण्याच्या शेगावमध्ये तूर खरेदी बंद झाल्याने आक्रमक शेतकरी रस्त्यावर उतरला असून, त्यांनी महामार्ग अडवून धरला आहे.

 

या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला शेतकरीही सहभागी झाल्या असून शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

यावेळी शेतकऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याकरता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *