तूर उत्पादक शेतकऱ्यांची सरकारविरोधात याचिका
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंदच आहेत. तर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतरही अद्याप आदेश जारी करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंदच आहेत.
22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राबाहेर रांगा लावल्या मात्र केंद्र अद्यापही बंदच आहेत. दरम्यान तूर उत्पादक शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात याचिका केली. त्यावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.