Wed. May 19th, 2021

तुर्भे येथील कंपनीला आग

तुर्भे एमआयडीसीमधील बालाजी कलर कंपनीला भीषण आग लागली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बालाजी पॉलीकोट्स या कंपनीत ही आग लागली. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला.

आगीमध्ये कंपनीतील रंगासाठी वापरलेल्या जाणाऱ्या केमिकलचे ड्रम पेट घेऊन फुटत होते. काही वेळातच ही आग बालाजी कंपनीच्या मागच्या बाजूलादेखील पसरली.

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *