Wed. Jun 26th, 2019

TV चॅनल बदललं नाही, म्हणून हत्या

0Shares

हरियाणाच्या गुरूग्राम येथे केवळ TV चॅनल बदललं नाही, म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

काय झाला राग अनावर?

मयत मुलगा वडिलांसोबत आरा मशीनजवळील एका खोलीत राहायचा.

मुलाचे वडील आरा मशीनवर काम करत.

घटनेच्या दिवशी मुलगा खोलीत टीव्ही पाहात होता.

तेव्हा तिथे काम करणारा उदय मंडल हा इसम तेथे आला.

त्याने मुलाला TV चॅनल बदलण्यास सांगितलं. पण, मुलाने मात्र चॅनल बदलला नाही. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं.

त्यावेळी इतर कामगारांनी मध्ये पडून दोघांमधील वाद मिटवला.

पण, उदय मंडलच्या मनात मात्र आपलं मुलाने न ऐकल्याचा राग गेला नव्हता.

रात्री मुलगा झोपला असताना उदयने त्याच्याजवळ जाऊन त्याचा गळा आवळला आणि झोपेतच त्याचा त्याची हत्या केली.

उदयविरोधात मुलाच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर उदयला अटक करण्यात आली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: