Sun. Sep 19th, 2021

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ‘नागिन ३’ मधील अभिनेता पर्ल वी पुरीला अटक

मुंबई : ‘नागीन’ फेम अभिनेता पर्ल पुरी (Pearl Puri) याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला असून कोर्टाने पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच पर्लचा जामीनही नाकारण्यात आला आहे. आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर/डब्ल्यू पोक्सो कायदा, 4, 8, 12,19, 21 अन्वये पोलिसांनी 4 जून रोजी रात्री पर्लला अटक करण्यात आली होती. पर्लची मैत्रीण अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने एक पोस्ट शेअर करत पर्लला जामीन मिळाल्याचे सांगितले होते. तसेच पर्लबरोबर फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘सत्यमेव जयते. सत्य जिंकले आणि पर्ल देखील जिंकला. पर्लला बेल मिळाली आहे.’ मात्र, आता डीसीपी संजय पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, पर्लला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि त्याला जामीनही मिळालेला नाही. पर्लवर 5 वर्षांच्या मुलीचा बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. म्हणून पर्लवर पॉस्को (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) अर्थात लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये आरोपींना जामीन मिळूच शकत नाही. कारण, याला अजामीनपात्र गुन्हा म्हणतात. त्यामुळे पर्ल पुरीचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तसेच त्याला न्यायलयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार , ही मुलगी अल्पवयीन असून या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे. म्हणून पर्लवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार मुलीच्या वडिलांनी केली असल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये असे लिहिले गेले आहे की, मुलीला पर्लबरोबर सेल्फी घ्यायची होती. त्यानंतर पर्ल तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेला. आणि तिथे त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला. प्रत्येक प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण 2019-20चा आहे, जेव्हा पर्ल मुंबईला लागून वसई नायगाव दरम्यान त्याच्या सीरियलसाठी शूट करत होता. त्यावेळी त्यांने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. असा आरोप मुलीच्या वडिलांनी पर्लवर केला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही मुलगी पर्लला त्याच्या ऑन-स्क्रीन नावाने ओळखत असे. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आईकडून कोणतेही विधान आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *