Sat. Jul 2nd, 2022

बारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर

मुंबई: दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे .अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली. उद्या म्हणजेच ३ ऑगस्टला बारावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केलीआहे. उद्या दुपारी ४ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!

सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पुढील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४ नंतर उपलब्ध होतील.

https://msbshse.co.in

https://hscresult.11thadmission.org.in

http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

https://lokmat.news18.com

तसेच, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.