अमेरिकेत टेक्सासमध्ये गोळीबार, 20 लोकांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी बेछूट गोळीबार केला यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 24 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी बेछूट गोळीबार केला यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 24 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला 21 वर्षीय तरुणाने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
अमेरिकेत गोळीबार!
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये शनिवारी एका अज्ञात हल्लेखोराने बेछूट गोळीबार असून यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासच्या एल पासो परिसरात वॉलमार्टमध्ये ही घटना घडली आहे. हा हल्ला २१ वर्षीय तरुणाने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या हल्ल्याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
एल पासो, टेक्सास येथे झालेला गोळीबार आणि हल्ला ही केवळ दुःखदायक व क्रूर घटना नसून हा एक भ्याड हल्ला होता. असं ट्विट ट्रम्प यांनी केला आहे.
अशा प्रकारच्या हल्लेखोरांचा मी निषेध करतो. या हल्ल्यात जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. निष्पाप लोकांना ठार मारण्याच्या कृत्याचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.
त्यादिवशी शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. पण 21 वर्षीय संशियत हल्लेखोराने बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या आहेत.
हल्लेखोराने काळा टी-शर्ट घातला होता आणि कानात हेडफोन घातले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.