Sun. May 31st, 2020

आता ट्विटरवरही उपलब्ध होणार ‘हे’ फिचर

आता फेसबुकप्रमाणेच ट्विटरवरचे ट्विटही आपल्याला एडिट करता येणार आहेत.

तसे नवीन फिचर लवकरच लाँच केले जाणार असून त्यामुळे ट्विटर अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर लवकरच 5 ते 30 सेकंदांचा डिले फिचर आणत आहे.

यामुळे ट्विट पोस्ट केल्यानंतर काही वेळात एडिट करता येईल आणि पुन्हा पोस्ट करता येईल.

ट्विटर हे मोबाइलवरील SMSच्या धर्तीवर तयार करण्यात आले असल्यामुळे त्यावर एडिटिंगचे फिचर उपलब्ध नव्हते.

पण गेल्या काही वर्षांपासून असे फिचर उपलब्ध करून द्या, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. यावर विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे डोर्से यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *