Mon. Aug 8th, 2022

Corona च्या धसक्याने कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याचे आदेश!

जगभरात Corona virus ची दहशत पसरली आहे. चायनामधून पसरलेला कोरोना पश्चिमेकडील देशांत वेगाने पसरतोय. या virus च्या भीतीने अनेक मोठमोठे उत्सव, समारंभ, सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. विविध देशांत परदेशी लोकांना मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना कामामध्ये थोडी सूट देत आहेत.

Twitter या सुप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून जगभरात काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. Twitter मध्ये 5000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. या सर्वांना Work from Home चे आदेश दिले गेले आहेत.

Twitter चे कर्मचारी घरी बसूनच काम करणार आहेत आणि त्याचा त्यांना पूर्ण पगार मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्यासाठी ज्या काही सेटअपची गरज पडणार आहे, त्याचे पैसेदेखील Twitter तर्फे देण्यात येणार आहेत. घरी बसून काम करत असल्यास जर कुटुंबियांना त्याचा त्रास होत असेल, तर Twitter त्यासाठीही मदत करणार आहे. महत्त्वाच्या बैठकादेखील Video Conferencing द्वारे घेतल्या जात आहेत.

हा फॉरमॅट इतर अनेक बड्या कंपन्या वापरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.