Sun. Sep 19th, 2021

कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरचा पुढाकार

देशात कोरोनाचा रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आरोग्य सुविधांवरील ताण, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या देशासमोर आहेत. या कोरोना महामारीच्या काळात भारताच्या मदतीसाठी अनेक मित्रराष्ट्रे धावून आली. आता ट्विटरने देखील भारताला मदतीचा हात दिला आहे.

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने भारताला १५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११० कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘ही रक्कम केअर, एड इंडिया आणि सेवा इंटरनेशनल यूएसए या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला १ कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत, असं जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *