Sun. Sep 19th, 2021

टि्वटरच्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत हा नेता प्रथम स्थानी

सोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच अग्रगण्य ठरलं आहे. त्यामध्ये टि्वटरचे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत.

दरम्यान टि्वटरने नुकताच लोकप्रिय वापरकर्त्यांचा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे टि्वट या वर्षाचे ‘गोल्डन ट्विट’ ठरले आहे. या ट्विटला तब्बल एक लाख १७ हजार १०० रीटि्वट, तर तब्बल चार लाख २० हजार लाइक्स मिळाले आहेत.

यानंतर या अहवालात मोदीनंतर राहुल गांधी यांनी दुसऱ्या स्थानी आपले नाव कोरले आहे. अशी माहिती टि्वटरने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.

तसेच टि्वटरच्या या अहवाल यादीत यावर्षी प्रथमच राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील पुरुष आणि महिला मान्यवरांची वेगवेगळी यादी जाहीर केला आहे.

यामध्ये राजकारणातील महिलांमध्ये स्मृती इराणी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तर दुसऱ्या स्थानावर प्रियंका गांधी वड्रा आहेत.

तर मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक फॉलोअर्स असून त्यानंतर अनुष्का शर्माची वर्णी लागते.

या यादीमध्ये व्यक्तींबरोबरच वर्षभरात ट्रेडींग मध्ये राहिलेले काही हॅशटॅगही जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ‘लोकसभा निवडणूक’ आणि ‘चांद्रयान २’ तर ‘पुलवामा’, ‘आर्टीकल ३७०’ हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *