Wed. Jun 16th, 2021

सरकारच्या नाराजीनंतर ट्विटरने चूक केली मान्य

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक ट्विटरने हटवली आहे.मात्र भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डलवरील ब्लू टीक कायम आहे.

उपराष्ट्रपती नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅन्डलवर त्यांचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर, उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ९.३ लाख फॉलोअर्स आहेत.

दरम्यान,सरकारच्या नाराजीनंतर ट्विटरने आपली चूक मान्य केली आहे. नायडूंसह संघाच्या नेत्यांना अधिकृत चिन्ह देऊ, असं ट्विटरने म्हटलंय.

ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटर वापरकर्त्यांना संबंधीत ट्विटर हॅन्डल खात्रीशीर, उल्लेखनीय आणि सक्रिय आहे, सांगण्यास मदत करतो. ट्विटरकडून अशा ब्लू टीक सरकारी कंपन्या, ब्रॅन्ड, गैर सरकारी संघटना, वृत्त संस्था, पत्रकार, राजकीय, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राशी निगडीत व्यक्ती तसंच इतर प्रभावशाली व्यक्तींच्या ट्विटर हॅन्डलला देण्यात आल्या आहेत.

ट्विटरच्या धोरणानुसार, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सूचनेशिवाय किंवा नोटिशीशिवाय ट्विटर हॅन्डलवरून ब्लू टीक आणि व्हेरिफाईड स्टेटस हटवला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *