Wed. Jun 19th, 2019

शिवछत्रपतींवर वादग्रस्त Tweet, पायल रोहतगी- जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली!

0Shares

राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी पायलने थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पायल रोहतगीचं थेट शिवाजी महाराजांवर वादग्रस्त Tweet!

आपल्या Tweet मधून पायल रोहतगी हिने थेट मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत मुक्ताफळं उधळली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीसंदर्भात पायल रोहतगी हिने वादग्रस्त वक्तव्य Twitter वर केलं आहे.

शिवाजी महाराज क्षत्रिय कुळातील नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचं तिने Tweet मध्ये म्हटलं आहे.

तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे.

पायलने ट्विटरवर छ.शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केलं आहे.

‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला होता. उपनयन संस्कार आणि पुनर्विवाहाद्वारे ते क्षत्रिय बनले, ज्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला. याचाच अर्थ पूर्वी लोक एका वर्णातून दुसऱ्या वर्णात प्रवेश करू शकत होते. म्हणजेच जातीयवाद नव्हता?’,

असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही अशीच पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं? असा प्रश्नही तिने विचारला आहे.

या Tweet वरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्या गोष्टीसंदर्भात माहिती नाही, त्याबद्दल न बोलण्याचा इशाराच तिला दिला आहे.

 

 

जितेंद्र आव्हाड यांच्या Tweet ला पायल रोहतगीचं प्रत्युत्तर-

Tweet वरून माझ्यावर टीका करू नका. मला माझ्या राजांबद्दल योग्य माहिती हवी आहे. म्हणून मी इतिहासकारांना याबद्दल विचारत आहे. मला माझ्या राजाबद्दल जाणून घ्यायचा हक्क आहे, असं तिने आपल्या Tweet मध्ये म्हटलंय.


 

यापूर्वीही अनेकदा पायल रोहतगीने वादग्रस्त वक्तव्यं Twitter द्वारे केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सती प्रथेसंदर्भात मुक्ताफळं उधळत तिने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात तिने वादग्रस्त वक्तव्य केलंय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: