लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करातानाच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच एक स्टंटबाजीचा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गुरुवारी सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान दोन तरुण स्टंटबाजी करत होते. लोकलमध्ये जीआरपीचा कर्मचारी असल्यामुळे दोघांना वडाळा स्थानकावर उतरुन ताब्यात घेतले.
नेमकं काय घडलं ?
लोकलमध्ये प्रवास करताना स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान दोन तरुण स्टंटबाजी करत होते.
लोकलमध्ये जीआरपी कर्माचारी असल्यामुळे या दोन्ही तरुणांना वडाळा स्थानकावर उतरुन ताब्यात घेतले.
या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.