Mon. Sep 23rd, 2019

एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान महाराष्ट्रातील 2 गिर्यारोहकांचा मृत्यू

0Shares

एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. अंजली कुलकर्णी (ठाणे) निहाल बागवान (अकलूज) यांचा या मोहीमेत मृत्यू झाला आहे. मोहीम पुर्ण करुन परतत असताना महाराष्ट्रातील या दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. कुलकर्णी या 54 वर्षाच्या होत्या तर बागवान अवघ्या 26 वर्षाचे होते. या दोघांनाही शिखर सर केल्यानंतर ते योग्य वेळेत परतू न शकल्याने त्यांना त्रास झाला.

नेमकं काय घडलं?

एव्हरेस्ट मोहीम पुर्ण करुन परतयेत असताना महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.

माऊंट एव्हरेस्ट सर झाल्यानंतर चौथ्या बेस कॅम्पजवळ यांचा मृत्यू झाला आहे.

गिर्यारोहक अंजली कुलकर्णी या 54 वर्षांच्या असून  या गेली पाच वर्षे एव्हरेस्टसाठी त्या प्रयत्न करत होत्या

त्या आणि त्यांचे पती शरद कुलकर्णी या दोघांनीही एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र उतरताना गर्दी असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

निहाल बागवान हे 26 वर्षाचे असून  शिखर सर केल्यानंतर ते योग्य वेळेत परतू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

निहालला त्रास होत असल्याने शेरपांच्या मदतीने त्याला चौथ्या कॅम्पपर्यंत आणण्यात आले आणि तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चौथ्या कॅम्पपासून शिखरापर्यंत एका वेळी एकच गिर्यारोहक पुढे जाऊ शकतो त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हा बेस कॅम्प २६ हजार फुटांवर आहे त्यामुळे  या दोघांचेही पार्थिव खाली आणण्यासाठी वेळ लागत असून आज त्यांचे पार्थिव खाली आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

एव्हरेस्टवर दुसऱ्या कॅम्पच्या पलीकडे हेलिकॉप्टर झेपावू शकत नाही. त्यामुळे दोन्ही पार्थिव चौथ्यावरून तिसऱ्या आणि मग तिसऱ्यावरून दुसऱ्या कॅम्पपर्यंत आणावे लागणार आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *