लाच घेताना दोन कॉन्स्टेबलला अटक

मुंबईहून स्क्रॅपसाठी आणलेली स्पोर्टस मोटारसायकल चोरीची असून गुन्हा दाखल करण्याची भिती घालून वकीलाच्या मुलाकडून १० लाखांची लाच स्विकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन कॉन्स्टेबलना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने दोन कॉन्स्टेबलला लाच स्विकारताना अटक केली आहे. विजय कारंडे, किरण गावडे अशी या दोन कॉन्स्टेबलची नावे आहेत. लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे दोघेही भांबावून गेले असून त्यांचा शनिवार पेठेतील लाचलुचपत कार्यालयात आनण्यात आले. तसेच याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.