Sun. Mar 24th, 2019

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे दोन फायटर विमाने दिसली

0Shares

भारतीय नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची दोन फायटर लढावू विमानांनी उड्डाण केली असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही विमानांवर भारतीय हवाई दलाचे लक्ष होते. जम्मू- काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेजवळ ही पाकिस्तानी विमाने उड्डाण करत होती अशी माहिती समोर आली आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे तीन विमानं भारतीय हद्दीत घुसखोरी करत होती. मात्र त्यांना भारतीय हवाई दलाने पेटाळून लावले. तसेच त्यावेळी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ ने पाकिस्तानचे एफ- १६ विमान पाडलं.

नेमकं काय घडलं ?

पाकिस्तानचे दोन फायटर विमाने भारतीय नियंत्रण रेषेजवळ उड्डाण करताना निदर्शनास आले.

या दोन्ही विमानांवर भारतीय हवाई दलाचे बारीक लक्ष होते.

जम्मू- काश्मीरच्या सीमेवर ही विमाने उड्डाण करताना दिसली.

ही विमाने वेगाने उड्डाण करत होती.

तसेच या विमानांच्या आवाजामुळे भारतीय रेषेवर गोंधळ निर्माण झाला. यामुळे या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *