Tue. Sep 28th, 2021

दोन गटात हाणामारी; तलवार, हॉकी स्टीकचा वापर

हॉकी स्टीक, तलवारीचा वापर करत दोन गटान तुंबळ हाणामारीची घटना समोर आली आहे. पनवेलमधील वाकडी येथे हा सर्व प्रकार घडला आहे.

नक्की प्रकरण काय ?

डी. के. भोपी हे क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष आहेत. डी. के. भोपी यांच्या घरावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला गावातील काही लोकांकडून केला असल्याची माहिती आहे.

हल्लेखोरांकडे तलवार, चॉपर, हाँकी स्टीक यासारखी धारदार शस्त्रे होती.

या हल्ल्यात हल्लेखोरांनी तीन सदस्यांवर तलवारीने वार करण्यात आले आहेत.

तर डी. के. भोपी यांच्या भाऊ दीपक किसन भोपी यांच्या गर्भवती पत्नीच्या पोटाला देखील दुखापत करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री जेवण करुन झोपलो असता अचानक रात्री 10.45 वाजताच्या दरम्यान ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा रुमचा दरवाजा उघडला.

दरवाजा उघडल्यावर धनंजय पाटील आणि अन्य बारा जणांनी प्रेम भोपीला घरासमोर हातात स्टंप, हॉकी स्टीक, तलवार आणि चॉपरने मारहाण करत असल्याचं दिसलं.

असं फिर्यादी दीपक किसन भोपी यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

दरम्यान जखमींवर एमजीएम हॉस्पीटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत. याबाबत संबंधितांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *