Mon. Jan 17th, 2022

जैश – ए मोहम्मदचे दोन दहशतवादी अटकेत

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसासह 42-आरआर आणि सीआरपीएफ-130 बटालयिनच्या तुकडीने संयुक्तपणे कारवाई केल्यामुळे हे यश आलं आहे.

या दहशतवाद्याचा सहभाग अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये होता. शिवाय जैश-ए-मोहम्मद संघटनेला संवेदनशील माहिती देखील ते पुरवत असून हे दशवादी अनेक हल्यात सहभागी असल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तैय्यबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.

लख्वी हा २०१५ मध्ये मुंबई हल्ला प्रकरणात जामिनावर सुटला होता. मात्र आता पाकिस्तान कडून लख्वीवर कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी विभागाने पंजाबमध्ये गुप्तचरांच्या मार्फत मोहीम राबवली होती. त्यात लख्वी हा दहशतवादाला अर्थपुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *