Jaimaharashtra news

चोंढी घाटात अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधील मालेगाव मनमाड मार्गावरील चोंढी घाटात अपघात झाला आहे. एसटी बसचा आणि कारचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

अपघातात गाडीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एसटी बसमधील 4 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत.

अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अपघातातील एसटी बसचा एमएच 20, डी 9209 क्रमांक आहे.

Exit mobile version