Mon. Dec 9th, 2019

या कारणासाठी इंदौरमध्ये लावण्यात आलं 2 तरुणांचं लग्न

वृत्तसंस्था, इंदौर

 

वेगवेगळ्या प्रकारची लग्न तुम्ही पाहिली असतील. मात्र मुलगा आणि मुलगी यांचं लग्न, या मुळ संकल्पनेलाच फाटा देणारं एक लग्न मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये पार पडलं.

 

इंदौरमध्ये चक्क 2 तरुणांचं लग्न लावण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे या दोघांचं लग्न समलैंगिक संबंधातून लावण्यात आलं नाही. तर फक्त अंधश्रद्धेच्या नावाखाली हे लग्न लावण्यात आलं.

 

मूसाखेडी गावचे गावकरी पाऊस नसल्यामुळे त्रस्त आहेत. या भागात अशी समजूत आहे की, दोन तरुणांचं लग्न लावलं की पाऊस पडतो. याच अंधश्रद्धेतून या दोघांचं लग्न लावण्यात आलं.

 

या तरुणांच्या लग्नानंतर थोड्याच वेळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊसही कोसळला. त्यामुळे नागरिकांनी याला तरुणांच्या लग्नाचा परिणाम समजत आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *