Thu. Sep 29th, 2022

दोन मंत्री, सहा आमदारांचा समाजवादी पक्षात प्रवेश

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्या असताना राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज लखनऊमध्ये शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह धर्म सिंह सैन आणि अन्य सहा आमदारांनी आज अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.

यावेळी स्वामी प्रसाद मौर्य यांनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हेच असतील, असा विश्वास धर्म सिंह सैनी यांनी व्यक्त केला आहे.

अखिलेश यादव यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विकेट पडत आहेत. अंतिम सामना सुरू झाला आहे. ही आत्मसन्माची लढाई आहे. तसेच जनतेला परिवर्तन हवे आहे आणि ते आता कुणीही रोखू शकणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. योगी यांना क्रिकेट खेळता येत नाही. त्यांच्या हातून कॅच सुटला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे, असेही ते म्हणाले.

1 thought on “दोन मंत्री, सहा आमदारांचा समाजवादी पक्षात प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.