Jaimaharashtra news

जळगावात ट्रॅक्टरखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

जळगाव मधील आडगाव-कासारखेडा फाट्यावर बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना गुरूवारी सकाळी घडली आहे.

अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला.

कसा घडला अपघात?

सकाळी सातच्या सुमारास विद्यार्थी रिक्षातून शाळेला जात होते.

भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टरने रिक्षाला उडवले.

या अपघातात नववीत शिकणारे हे दोन्ही विद्यार्थी चिरडले गेले.

अपघात इतका भीषण होता की, मुलांचे मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता.

अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली. नंतर त्यांनी तो ट्रॅक्टरही पेटवून दिला.

या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचे सांगण्यात येते.

 

Exit mobile version