Fri. May 7th, 2021

पुलवामामध्ये बुलढाण्यातील 2 जवान शहिद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले आहेत.

यामध्ये बुलढाण्यातील जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड या जवानांचा  समावेश आहे.

संजय राजपूत  हे बुलढाण्यातील  मलकापूर येथील तर नितीन राठोड हे लोणार तालुक्यातील आहेत.

संजय राजपूत यांना 4 भाऊ आणि एक बहीण आणि 2 मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.

नितीन राठोड हे लोणार तालुक्यातील बीबी या गावचे रहिवासी आहेत.

या घटनेमुळे दोघांच्या गावात शोककळा पसरली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या गावात नितीन राठोड नावाची दोन व्यक्ती असून दोघेही सीआरपीएफमध्येच आहेत. त्यामुळे गावात संभ्रमाचे वातावरण आहे.

तर संजय राजपूत यांच्या भावांना याची माहिती मिळाली असली तरी आई आणि पत्नीला यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने या दोन जवानांसंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *