Sat. Apr 4th, 2020

तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

तलावात पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आज सोमवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.

हे दोन्ही विद्यार्थी धर्माबाद शहरातील गुरुकूल विद्यालयातील विद्यार्थी होते. हे दोन्ही विद्यार्थी नववी इयत्तेतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साईचरण किशन आल्लूरोड आणि लक्ष्मण सिद्धपा राचेवाड असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.

सोमवारी दुपारी १२ च्या दरम्यान साईचरण आणि लक्ष्मण हे दोघे आपल्या इतर तलावात पोहायला गेले होते.

दरम्यान लक्ष्मण आणि साईचरण या तलावात पोहायला उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झालाय.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या दोन तासांच्या शोधानंतर दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *