Thu. Jul 18th, 2019

पुलवामामध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांंचा खात्मा, 1 जवान शहीद

0Shares

पुलवामा येथे दलीपोरा मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे तर दोन दहशतवाद्यांंचा  खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. यामध्ये आणखी दोन जवान जखमी झाल्याची माहीती आहे. दरम्यान या चकमकीत एक नागरीक जखमी झाला आहे. या चकमकीमुळे पुलवामा मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला होवून यामध्ये 41 जवान शहीद झाले आहेत. काही दहशतवादी अजूनही याठीकाणी लपून बसल्याने अशी चकमकी होत असतात.

पुलवामामध्ये चकमक

जम्मु काश्मीरच्या पुलवामा मधील दालीपोरा मध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यां दरम्यान चकमक सुरू आहे.

रात्री उशीरापासून दहशतवादी आणि सुरक्षादलांदरम्यान गोळीबार सुरु होता.

दालीपोराच्या घरामध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलांना घेरले गेल्याची माहीती मिळाली आहे.

या चकमकीत दोन दहशतवाद्यांंचा मृत्यू तर तीन जवान जखमी तर एक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

या चकमकीत एक नागरीक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या चकमकीमुळे पुलवामा मध्ये संचारबंदी तसेच दालीपोरा मध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *