Fri. Apr 23rd, 2021

काश्मीरच्या कुलगामात चकमक सुरू; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सैन्य दल ाणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून भारतीय सैन्य दलाने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरल्याचे समजते आहे. तसेच लष्कराच्या जवानांनी परिसराला चारही बाजुनी वेढले असून चकमक अद्याप सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.

केलम येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाताच भारतीय सैन्य दलांनी शोध मोहिम सुरू केले. भारतीय सैन्य दलाच्या 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू- कश्मीर पोलीस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या जवानांनी चारही बाजुनी वेढले. यावेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सैन्य दलावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक अद्याप सुरूच आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *