Fri. Jun 21st, 2019

जम्मू-काश्मीर :  जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

23Shares

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक सुरू झाली.

चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

परंतु यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत.

लपलेल्या दहशतवाद्यांसांठी शोधमोहीम सुरू

  •  केलम आणि कुलगा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना 9 फेब्रुवारी रोजी रात्री मिळाली.
  • यानंतर भारतीय लष्कराने शोधमोहीम सुरू केली.
  • कुलगाममध्ये  10 फेब्रुवारी रोजी जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरच स्फोटकांनी उडवले.
  • यामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
  • केलममध्येही 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी घेराव घालत शोधमोहीम सूरु केली.
  • मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
  • यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
  • परंतु यामध्ये दोन जवान शहीद झाले.

दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त 

  • शोध मोहिमेदरम्यान जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि अन्य साहित्यही जप्त केलं आहे.
  • ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका मोस्ट वॉन्डेट दहशतवादी कमांडरचाही सहभागी असू शकतो.

 

 

 

23Shares

Leave a Reply

%d bloggers like this: