Sun. Aug 18th, 2019

रेल्वे रुळावर पबजी खेळताना दोघांचा मृत्यू

73Shares

तरुणांमध्ये पबजी गेमचं चांगलेचं वेड लागल्याचे दिसत आहे. यामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर चिरडून या दोघांचा मृत्यू झाला आहे.नागेश गोरे (वय २२) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय २४) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग होते आणि त्यातचं दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

नागेश आणि स्वप्नील हे दोन्ही मित्र असून सायंकाळी ६.४५ वाजण्याचा सुमारास रेल्वे रुळाजवळ मोटारसायकल उभी करुन रेल्वेरुळावर पबजी गेम खेळत बसले होते.

याचवेळी अचानक समोर आलेल्या अजमेर-हैदराबाद रेल्वेच्या धडकेने दोघेजण रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती अंधार असल्याने जमलेल्या नागरिकांनी मोबाईल बॅटरीच्या मदतीने मृतदेह ओळखले.

हे दोघे मित्र हनुमान नगर येथील रहीवासी असून दोन्ही तरूणांचा मृ्त्यू झाल्याने हिंगोली परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना घटनेची माहीती मिळताच त्याठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली.

याच दरम्यान दुसरी रेल्वे आली असता लोकांनी त्या रेल्वेला थांबवून रेल्वे रुळावरील दोन्ही तरुणांचे मृतदेह बाजूला काढण्यात आले.

73Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *