Mon. Dec 6th, 2021

Uber Eats, Zomato, Swiggy ला ‘येथे’ मात्र उशीर!

ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याची सेवा देणाऱ्या Uber Eats, Zomato, Swiggy या कंपन्यांना अन्न व सुरक्षा विभागातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्याने सुरक्षित अन्न हाताळण्याचा परवाना सात दिवसांच्या आता घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंपन्यांनी सात दिवस उलटल्यावरही हा परवाना घेतलाच नाही. अखेर त्यांच्यावर आता कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता या कंपन्यांकडुन परवाना घेण्याची लगबग सुरू झाली आहे

सध्या Uber Eats, Zomato, Swiggy या कंपन्यांचा बोलबाला आहे.

शहरातल्या कुठल्याही भागात तुम्हाला कुठल्याही हॉटेलमधुन काही हवं असल्यास या कंपन्या अगदी काही वेळात तुमची ऑर्डर तुमच्या पर्यंत पोहोचवतात.

हा ट्रेंड आता इतका वाढू लागला आहे, की शहरातल्या जवळपास सगळ्याचं मोठ्या हॉटेल्स आणि रेटॉरंट्सने या कंपन्यांशी टाय अप करुन घेतलं आहे.

मात्र असं असलं तरी या कंपन्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

अन्न व सुरक्षा विभागाकडून या कंपन्यांच्या कर्मचा-यांना सुरक्षित अन्न हातळणीचा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे.

त्यामुळे जर कंपन्यांकडे हा परवाना नसेल तर त्यांनी 7 दिवसांत अन्न व सुरक्षा विभागाकडून हा परवाना घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान सात दिवसांच्या आत या कंपन्यांकडून परवाना घेतला गेला नाही तर कठोर करावईचा इशाराही अन्न व सुरक्षा विभागाकडून देण्यात आला.

शहरात सेवा देणा-या या कंपन्यांचे मुख्य कार्यालय मुंबईत आहेत.

स्थानिक पातळीवर याबाबत बोलण्यास या कंपन्यांचे कर्मचारी अथवा अधिकारी तयार नाहीत.

‘जय महाराष्ट्र’ नेदेखील याबाबत या कंपन्यांशी नाशिकमध्ये संपर्क केला, मात्र याबाबत बोलण्यास या कंपन्यांच्या नाशिक कार्यालयांनी नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *