Tue. Aug 9th, 2022

उदय सामंत शिंदे गटात सामील

शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. उदय सामंत हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे होते.

उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वीच ‘मी शिवसेनेसोबतच आहे’, असे वक्तव्य केले होते. तसेच सध्या एकसंघ राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. परंतु उदय सामंत रविवारी सकाळपासून नॉट रिचेबल होते. ते रविवारी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. उदय सामंत सध्या हॉटेल रेडिसन ब्लूकडे रवाना झाले आहेत. सामंत यांच्या जाण्याने विधानसभेतून निवडून आलेले केवळ आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला  धक्का बसला आहे. या सर्व घटनेमुळे महाविकास आघाडी सरकारचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.