शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. उदय सामंत हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे होते.
उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वीच ‘मी शिवसेनेसोबतच आहे’, असे वक्तव्य केले होते. तसेच सध्या एकसंघ राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. परंतु उदय सामंत रविवारी सकाळपासून नॉट रिचेबल होते. ते रविवारी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. उदय सामंत सध्या हॉटेल रेडिसन ब्लूकडे रवाना झाले आहेत. सामंत यांच्या जाण्याने विधानसभेतून निवडून आलेले केवळ आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. या सर्व घटनेमुळे महाविकास आघाडी सरकारचे मोठे नुकसान झाले आहे.
कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध सहज विजय…
अहमदनगर जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस…
मुंबईमध्ये रविवारचा संपूर्ण दिवस मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार होती. उपनगरांमध्ये…
सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते…
संजय राऊतांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात कारवाई कऱण्यात आली…
बरेच दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा…