Sun. Jun 16th, 2019

“… तर नाईलाजाने नक्षलवाद्यांचं नेतृत्व करावं लागेल”- छ. उदयनराजे!

0Shares

महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी तालुक्यांना सरकारतर्फे मदत मिळावी यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त यादीतून गायब केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला ग्रामस्थांसह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त भागाच्या पहाणीच्या वेळी सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ऐन दिवाळीत खर्डा भाकरीचं आंदोलन केलं जातय. या आंदोलनाला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी जनतेच्या वतीने सरकारला जाबही दिला.

“लोकांची कामं वेळीच करा. नाहीतर संतापलेल्या लोकांमधून नक्षलवादी तयार होतील आणि उद्या नक्षलवादी तयार झाले तर मला नाईलाजाने त्यांचं नेतृत्व करावं लागेल” अशा शब्दांत उदयनराजे यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. दुष्काळामुळे अनेक तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करावी यासाठी विरोधक आक्रमक होत आहेत. साताऱ्यात खर्डा भाकरी आंदोलनामध्ये खा. उदयनराजे यांनी स्वतः सहभाग घेतला.

नक्षलवाद ही देशापुढील गंभीर समस्या आहे. मात्र जर सरकारकडून गरीब जनतेला मदत मिळाली नाही, तर आंदोलन करणारी जनता हातात शस्त्र घेऊ शकते, याची जाणीव उदयनराजे यांनी आपल्या वक्तव्यातून करून दिली. शस्त्रं घेऊन सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवाद्यांचं आपल्याला नाईलाजाने समर्थन करावं लागेल असं उदयनराजेंनी थेट विधान केलंय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *