Wed. Jul 28th, 2021

सैनिकांच्या आठवणीने उदयनराजे भावूक

राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या दु:खद घटनेमुळे आपला ५१ वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांनी आज  एका वेगळ्या प्रकारे त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे.

आज वाढदिवसाच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील १२७ शहीद जवानांच्या कुटूंबाचा सन्मान सोहळा घेतला.

कराड येथील प्रितीसंगमावर हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला शहीद जवान कुटूंबातील पत्नी,माता,बहीण,भाऊ सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात एनसीसी आणि कॅडेट्सने संचलन केले.तसेच बेळगाव येथून मिलिटरीचे अधिकारी आणि मिलटरी बँन्डसुद्धा यावेळी उपस्थित होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले,यावेळी 2000 मेनबत्त्यांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला.

उदयनराजे भोसलेंची शहिदांना श्रद्धांजली

आपल्याला नेहमी शहीद जवानांची आठवण झाली पाहीजे.

आमदार खासदार यांनी शहीद जवानांचा विचार करायला हवा

बॉम्ब हल्ले अशा रोज बातम्या ऐकायला मिळत आहेत.

आपल्या या जवानामध्ये खूप शौर्य आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

सरकारने जवानाना काय दिलं याचाही विचार झाला पाहिजे

पुलवामा सारख्या घटनांवरसरकारनं ठोस पाऊल उचलल पाहिजे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *