Jaimaharashtra news

… म्हणून उदयनराजे वाढदिवस साजरा करणार नाही

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यावेळी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यााकरीता बनवला होता. यासाठीच उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आपण यावेळी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे.

उदयनराजे यांनी पत्रात काय लिहिलं ?

24 फेब्रुवारीला उदयनराजे यांचा वाढदिवस आहे.

पुलवामा हल्ल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आपला वाढदिवस साजरा करणार नाही.

यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं.

वाढदिवस येतात आणि जातात, मात्र आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं यामुळे वाढदिवस साजरा करत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच कार्यकर्त्यांनी राज्यभरात कुठेही शुभेच्छांचे फलक लावू नये.

हार पुष्पगुच्छ भेट म्हणून देऊ नये असेही या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यामुळे 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत.

त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला याची कल्पना न केलेली बरी.

आज देश एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपला आहे.

भारतीय जवान असे वीरमरण केवळ देशाच्या सीमा अभेद्य ठेवण्यासाठी जवान स्विकारत आहेत.

त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

आम्हाला वाढदिवसाचं औचित्य फार नाही. वाढदिवस येतील आणि जातील.

तथापी आजच्या घडीला जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे’.

 

Exit mobile version