Wed. Jun 26th, 2019

EVM मशीनवर माझा विश्वास नाही – उदयनराजे भोसले

0Shares

लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. तब्बल 349 जागांपर्यंत भाजपाने धडक दिली दिली आहे. एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता या पक्षाने कायम राखली आहे.या निवडणुकीत भाजपला 349
इतर 107 तर काँग्रेसला 86 मत मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने काँग्रेसचा सुपडासाप केला असल्याची स्थिती आहे. याला EVM मशीन जबाबदार आहे. असं वक्तव्य
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते

काय म्हणाले उदयनराजे?

EVM-VV पॅट मशीनवर माझा विश्वास नाही. कॉम्प्युटर हॅक करू शकतो. तर हे मशीन पण करु शकतात.

सर्व विरोधी पक्षांची मागणी बॅलेट पेपरवर मतमोजणी घ्यावी अशी होती तरी घेतली गेली नाही.

या देशात नेमकं चाललय तरी काय असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.

कराड येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते .

सातारा मतदारसंघातुन विजयी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केले

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केले आहे.

राजस्थान सारख्या काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात एकही उमेदवार निवडून येत नाही.

याबाबत आश्चर्य व्यक्त करत उदयनराजेंनी याचे खापर EVM मशीनवर फोडले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: