Fri. Sep 17th, 2021

उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसला राम राम केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उदयनराजे यांनी मध्यरात्री आपला राजीनामा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सुपूर्द केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे मंत्रीही उपस्थित होते.

काय म्हणाले उदयनराजे?

शाहू महाराजांचे विचार घेऊन भाजप पुढे जात आहे.

शिवरायांच्या विचारांवर भाजपचं कार्य सुरू आहे.

मोदी-शहांनी लोकशाही मजबूत केली.

भारताची अखंडता त्यांनी कलम 370 हटवण्यासारखा निर्णय घेतला.

निस्वार्थी भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय.

आपणही त्यांना साथ देऊन लोकशाही बळकट करणार.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

शिवरायांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते, त्याच शिवाजी महाराजांचे वंशज आज भाजपमध्ये आले आहेत.

उदयनराजे जनतेमध्ये वावरतात. राजे असूनही लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवतात आणि जनतेची कामं करतात.

त्यामुळे उदयनराजे आमच्यासोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. याचा फायदा भाजपला आणि समाजाला होईल, असा मला विश्वास आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती.

मात्र या चर्चेला स्वत: उदयनराजे यांनी पूर्णविराम दिला आहे.

आज मध्यरात्री दिल्लीला जाऊन उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राजीनामा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सुपूर्द केला.

उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

तर साताऱ्यात पोटनिवडणूक पार पडणार असून ही निवडणूक विधानसभाबरोबरच पार पडणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *