Sat. Nov 27th, 2021

भगव्याशी गद्दारी करणाऱ्याची गय नाही – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत अनेक नेते त्यांच्या सभा घेत आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापूरात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सुशीलकुमार शिंदे आणि पवारांवर जोरदार टीका केेली आहे. 

काय म्हणाले उध्दव ठाकरे ?

एकेकाळी भगवा दहशतवाद म्हणून संबोधणारे आज जनतेला लुटून,खाऊन थकले आहेत . शिंदे – पवार यांनी नको ते धंदे केल्यामुळे त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात  केला आहे.

तसेच भगव्याशी गद्दारी करण्याच्या नादी लागू नका असेही त्यांनी सांगितले आहे. ठाकरे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेवर टीका करत भगवा दहशतवाद म्हणणारे आज थकले आहेत . ते खरेच आहे. जनतेला लुटून त्यांना थकवा आला आहे.

सोलापूर शहरातील उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील कर्णिकनगर येथील जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली आहे. तसेच शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदापासून अनेक पदे होती मात्र त्याचा कधी सोलापूरला उपयोग करून घेतला आहे. असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *