Fri. Sep 30th, 2022

रामदास कदम यांच्याविरोधात उद्धव गटाचा तीव्र संताप

ठाकरे कुटुंबियां विरोधात वक्‍तव्‍य करणारे माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्‍या विरोधात आंदोलन केले. कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. तर नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालय शालिमार या ठिकाणी रामदास कदम यांच्या पुतळ्याच दहन करण्यात आले. रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली. यावरून मुंबईसह कोकणातील शिवसेना नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत… अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.

किशोरी पेडणेकर यांचं प्रतित्त्योर

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या वक्तव्यानंतर रामदास कदम यांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही तुम्हाला भाई म्हणत होतो, पण तुम्ही भयंकर निघालात. किचनपर्यंत टीका करण्याइतपत तुमची जीभ सैल सुटली, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबाबत वापरलेली भाषा राजकारणातली नाही. तसं असतं तर आम्हीही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला हवं का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

1 thought on “रामदास कदम यांच्याविरोधात उद्धव गटाचा तीव्र संताप

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.