Wed. May 22nd, 2019

मसूद अझहरला चीन ‘संत’ म्हणून मान्यता देणार काय? – उद्धव ठाकरे

58Shares

मसूद अझहरला युनोमध्ये दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना खोडा घालून चिनी अजगराने त्याचं खरे स्वरूप पुन्हा दाखवले. त्यामुळे पाकिस्तानला बळ मिळेल. मसूद अझहर हा एक मोहरा आहे. तो सहज हाती मिळणार नाही. पाकिस्तानला श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे आणि  चीन त्यांना प्राणवायू देत आहे.

जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील राजकरण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा. हे केलं तरी साध्य होईल, असं मत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून मांडले आहे.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे ?

भारत आणि पाकिस्तान  या  दोन राष्ट्रांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवायला पाहिजे.

पाकिस्तानने आपली भूमी दहशतवादासाठी वापरायला देणार नाही असे सांगून वेळ मारून नेणं म्हणजे पाठिंबा नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर आणि भारताने केलेल्या हल्ल्यानंतर चीनची भूमिका तटस्थ होती.

त्याचा अर्थ आपल्या कूटनीतीकरांनी असा घेतला की, चीनही आता पाकिस्तानच्या पाठीशी उभा नाही.

पण चीनची तटस्थता आणि सोयीचे मौन हे घातक असते, हे युनोतील सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा दिसून आले.

चीनने ज्या प्रकारे युनोच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरचा बचाव केला.ज्या प्रकारे पाठिंबा दिला तो सर्वच प्रकार किळसवाणा आणि तितकाच निघृण आहे

जगातील दहशतवाद हा गंभीर आहे.पाकड्यांनी पुलवामात आमचे 40 जवान मारले.

भारताने त्यांचे एक एफ-16 विमान पाडले.जैशच्या तळावर हल्ले करून ती आतंकवादी मारले, यावर हिंदुस्थानात प्रश्न उपस्थित होता.

पुलवामा हल्ला हा हिंदूस्थानातील हल्ला आहे.कश्मीरात मारला जाणारा जवान म्हणजे हिंदुस्थानच्या काळजात घुसलेला वार आहे.

विरोधी पक्षांनी थोडं जबाबदारीने वागावं आणि सत्ताधारी पक्षानं संयम बाळगावा, हा यावरील मध्य मार्ग आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून आपली भूमीका मांडली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *