Mon. Dec 6th, 2021

उद्धव ठाकरे कॅप्टन, अजित पवार उपकर्णधार, पाहा टीम महाविकासआघाडी

सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी राज्यपालांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.

एकूण 36 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 26 जणांनी कॅबिनेट तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महाविकासआघाडीची एकूण 43 जणांची मंत्रिमंडळाची टीम आहे. उद्धव ठाकरे या टीमचे कॅप्टन आहेत. तर अजित पवार हे उपकर्णधार आहेत.

टीम महाविकासआघाडीतील डेब्यु मंत्री

आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे हे चौघे पहिल्याच झटक्यात आमदार म्हणून निवडून आले.

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच (डेब्यु) निवडून आलेल्या या चार आमदारांना थेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.

यामध्ये वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांची हॅट्रिक

अजित पवारांनी सोमवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेण्याची ही अजित पवारांची तिसरी वेळ आहे.

यासह अजित पवारांनी एक रेकॉर्ड केला आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. अजित पवारांनी याआधी 23 डिसेंबर 2019 ला भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

पण हे सरकार अल्पमतात आल्याने टिकू शकले नाही.

तसेच अजित पवारांनी 2009 साली आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *