Tue. Jan 18th, 2022

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची चौफेर टोलेबाजी

नागपूर : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना फडणवीस यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली आहे. भाजपला स्वातंत्र्यावीर सावरकरांचे गाईबाबतचे मत मान्य आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. उद्धव ठाकरे आज विधानसभेत चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विविध मुद्द्यावरुन चांगलाच टोला लगावला.

गोरगरिबाचं सरकार

‘हे गोरगरिबाचं सरकार आहे. गोरगरिबांना बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षातूनच जावं लागेल.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे तीन चाकी सरकार आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

कमी बोलणं, जास्त काम

कमी बोलायचं आणि जास्त करायचं, असं आमच्या सरकारने ठरवलं आहे. कमी बोलावं आणि जास्त करावं ही आपल्या साधूसंताची शिकवण आहे. माझ्या भाषणात महाराष्ट्राच्या स्थगतिची नाही प्रगतीची गीता आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये काही प्रकल्पांना स्थगिती दिल्याने सरकारवर टीका करण्यात आली होती.

आम्ही दिलेली वचनं पाळणार

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करायचं असेल, हे माझं सरकार नाही, आमचं सरकार आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी या आणि अनेक मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाला चांगलेच सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *