Jaimaharashtra news

‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या’

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची गरज स्पष्टपणे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत ६७ हजार ३३० उपचाराधीन रुग्ण आढळले आहे. तर सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या पाच जिल्ह्यांत २६ हजार ६४० असे १० जिल्ह्यांत ९४ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. ४२ हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. १० जिल्ह्यांतील साप्ताहिक बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेत. निर्बंध शिथिल केल्यापासून बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर ‘घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका’ अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे. ‘रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, हिंगोली या जिल्ह्यांनी काळजी घ्यावी’ असं देखील त्यांने स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version