Sat. Jul 31st, 2021

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई : महिन्याभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्या रुपात मुख्यमंत्री मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे.  उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसोबतच महाविकासआघाडीच्या काही नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या नेत्यांनी घेतली शपथ

शिवसेनेकडून आमदार एकनाथ शिंदे तसेच ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

तसेच काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

या सर्व नेत्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

या शपथविधीला नेतेमंडळींपासून बॉलिवूडमधील दिग्गजांची देखील उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *