नियमितपणे कर्जफेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच एक योजना – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत अनेक घोषणा केल्या. यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी 2 लाखांची कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीची रककम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात येणार आहे.
‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ असे या योजनेचं नाव आहे.
या योजनेनंतर ठाकरे सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना आणत आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
हे ही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानसभेत मोठ्या घोषणा
नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत ही योजना असणार आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री ?
नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी येत्या 15 दिवसांमध्ये एक योजना तयार करतोय. ही योजना तयार झाल्यानंतर आम्ही लवकरच जनतेसमोर आणू, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.