Mon. Dec 6th, 2021

आमच्याकडून पंतप्रधान पदासाठी मोदीच – उद्धव ठाकरे

 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आज भाजप- सेनेने कोल्हापूरमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजीत केला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करत भाषणाला सुरुवात केली. महामेळाव्यात युवा नेता आदित्य ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. तसेच विरोधकांमध्ये पंतप्रधान पदासाठी संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

माथाडीचा नेता खासदार बनवून दिल्लीत पाठवायचा आहे.

आता राजकीय धुळवड सुरू होणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना- भाजपाला एकत्र पाहण्याची जनतेची इच्छा आहे.

आमच्याकडून पंतप्रधान पदासाठी मोदीच ठरले असल्याचे ते म्हणाले.

गिरीश महाजन दिसले ती विरोधकांना धाक पडतो.

महाआघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही.

खुर्ची दिसली की शरद पवार येऊन बसतात अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *