उद्धव ठाकरेंचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती सर्व मंत्री उपस्थित होते. आज होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. कालच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याच बरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हंटले आहे .बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधून हा निर्णय सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली.तर या हे सगळे सांगताना त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे देखील आभार मानले. ते म्हणाले कि मला पवारसाहेब, सोनियाजी , काँग्रेस आणि राष्ट्रवादी खास धन्यवाद द्याचे आहेत. खेद एका गोष्टीच वाटत कि या ठरावाच्या वेळी मी आदित्य सुभाष देसाई आणि अनिल परब चारच शिवसेनेची मंत्री होते बाकी सगळे मंत्री तुम्ही जनता हा ठराव मांडल्यानांतर काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादीने एका शब्दाने विरोध केला नाही . तातडीने मंजुरी दिली त्यांना मी धन्यवाद देतो ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केलं आहे.”