Thu. Sep 19th, 2019

सरकारनं गुंडांचा बंदोबस्त करावा – उद्धव ठाकरे

0Shares

जय महाराष्ट्र न्युज, अहमदनगर

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच सोबत सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला. हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले वसंत ठुबे आणि संजय केतकर यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.  शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *