Sat. Jun 19th, 2021

धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार धवलसिंद मोहिते पाटील यांची हकालपट्टी केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असल्यामुळे राजकीय नेते उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली करत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच त्यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील हालचाली करत होते.

याची माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी केल्याचे समजते आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *