उद्धव ठाकरे यांच्या ड्रायव्हरकडून कोर्टातच धमकी

उद्धव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवे कडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांना पनवेल कोर्टात धमकी देण्यात आली. पनवेल कोर्टात (DIG) निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना मुलीचे वडिलांच्या जवळ जात ‘ शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू’ अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आली.
धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.
गेल्या 15 दिवसापासून कॉन्स्टेबल असलेले दिनकर साळवी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत.
निशिकांत मोरेला दिनकर साळवी गेल्या 15 वर्षांपासून ओळखत आहे.